Saturday, November 10, 2018

मेजर सुभेदार सोलनकर यांचे आसाममध्ये हृदय विकाराने निधन


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील हिवरे येथील भारतीय  सैन्यातील  मेजर बाळासो ज्ञानु सोलनकर  (वय 45 ) यांचे आसाममध्ये हृदय विकाराने शुक्रवारी रात्री  निधन झाले. ते आसाम मध्ये कार्यरत होते. त्यांचे पार्थिव रविवारी रात्री ९.०० वाजता पुणे येथे येणार आहे . अंत्यविधी सोमवारी  हिवरे येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी , दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा नुकताच सैन्यात भरती झाला आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांना मेजर पदी बढती मिळाली होती. त्यांच्या अकस्मात निधनाने हिवरे गावात शोककळा पसरली आहे.

No comments:

Post a Comment