Wednesday, November 21, 2018

सात गावांमध्ये समाज मंदिर बांधणार: जगताप


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील सात गावांमध्ये समाज मंदिर बांधण्यासाठी दलित वस्ती सुधार योजनेतून 70 लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार विलासराव जगताप यांनी दिली.
तालुक्यातील संख, बिळूर, तिकोंडी, डफळापूर, उटगी, अक्कळवाडी आणि गिरगाव या सात गावांमध्ये दलित सुधार योजनेतून समाज मंदिर बांधण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. प्रत्येक समाज मंदिरासाठी दहा लाख रुपये मंजूर आहेत. लवकरच यांच्या बांधकामाला सुरूवात होईल.यापूर्वीही जिल्हा नियोजन आणि 14 व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून आणि दलितवस्ती सुधार योजनेतून भरीव निधी प्राप्त झाला आहे, अशी माहिती आमदार श्री. जगताप यांनी दिली.

No comments:

Post a Comment