Tuesday, November 13, 2018

कुडणूर खून प्रकरणातील आरोपीस कुर्डुवाडीतून अटक

जत'(प्रतिनिधी)- 
कुडणूर (ता. जत) येथील सिध्दू उर्फ आकाश बाळासो सरगर याच्या खूनातील फरारी आरोपी प्रमोद तानाजी खांडेकर याला जत पोलिसांच्या पथकाने सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनवरून अटक केली आहे. त्याला बुधवारी जत न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 
     पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून बुधवारी दि. ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता सिध्दू सरगर याचा डोक्यात टाॅमीने वार करून आरोपी प्रमोद खांडेकर हा फरार झाला होता. यानंतर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे, उपाधीक्षक अशोक बनकर, पोलिस निरीक्षक अशोक भवड यांच्या मार्गदर्शनाखाली जत पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रणजीत गुंडरे, उमर फकीर, संदीप नलवडे यांनी सापळा रचून कुर्डुवाडीतून खांडेकर याला अटक केली असून त्याने खूनाची कबुली दिली आहे.

No comments:

Post a Comment