Friday, November 16, 2018

मिरज अध्यापक विद्यालयात आज माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

जत,(प्रतिनिधी)-
 सुवर्णमहोत्सवी वर्षेनिमित्त मिरज येथील अंबाबाई तालीम संस्थेच्या शेठ रतीलाल  विठ्ठलदास गोसलिया अध्यापक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आज रविवारी आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध विचारवंत इंद्रजित देशमुख यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन व  माजी शिक्षण संचालक  संपतराव गायकवाड यांचे प्रमुख व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
   अध्यापक विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षेनिमित्त पहिल्यांदाच १९६८ पासूनचे सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येत हा स्नेहमेळावा मोठया प्रमाणात  साजरा करण्याचे योजले आहे.  प्राचार्य गौतम शिंगे, प्रा. उत्तम पांढरे, प्रा. पाटील, प्रा. माने यांच्या मार्गदर्शनाखाली या स्नेहमेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. हा मेळावा दोन सत्रात होत आहे. संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांच्या अध्यक्षतेखाली  व इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन करण्यात येणार असून  यावेळी माजी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या 'स्मृतिगंध' या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. दुसऱ्या सत्रात महाविद्यालयाचे प्राचार्य गौतम शिंगे यांच्या अध्यक्षतेखाली संपतराव गायकवाड यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर सायंकाळी माजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतीक  कार्यक्रम व मनोगत होणार आहे. या सुवर्णमहोत्सवी स्नेहमेळाव्यास माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे , असे आवाहन संयोजन समितीकडून करण्यात आले आहे.

1 comment: