Friday, November 9, 2018

कूडणूर खून प्रकरण पूर्ववैमनास्यातून


जत,(प्रतिनिधी)-
कुडणूर (ता.जत) येथील सिध्दनाथ बाबासो सरगर या तरुणाचा टॉमीने हल्ला करून खून करण्यात आला होता. ही घटना बुधवार दि.7 नोव्हेंबर रोजी ऐन लक्ष्मी पूजनाच्या रात्री कूडणूर येथील खांडेकर मळ्यानजीक घडली होती. सिध्दनाथ यांचा हा खून पूर्ववैमनास्यातून झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र संशयीत आरोपी अद्याप फरार आहे. लक्ष्मीपुजनाच्या दिवशीच झालेल्या या खूनाच्या घटनेने कुडणूरसह परिसरात घबराट पसराली होती.
सिध्दनाथ सरगर हे व्यवसायाने ट्रॅक्टर चालक होते. त्यांचा गावातील टेम्पो चालक प्रमोद तानाजी खांडेकर यांच्याशी जूना वाद होता. सहा महिन्यापुर्वी दोघांत हाणामारीपर्यत वाद झाला होता. बुधवार दि.7 नोव्हेंबर रोजी ही त्यांच्यात पुन्हा वाद झाला. यामुळे सिध्दनाथवर प्रमोद चिडून होता. सिध्दनाथ दुचाकीवरून घरी जात असताना पाहिले आणि प्रमोद याने त्याच्या टेम्पोतून पाठलाग केला. खांडेकर वस्तीनजीक त्याने सिध्दनाथच्यासमोर टेम्पो आडवा उभा केला. आपल्याजवळील टॉमीने  यावेळी सिध्दनाथच्या डोक्यात या शस्त्राने प्रहार केला. त्यात सिध्दनाथची डोक्याला गंभीर मार लागल्याने तिथेच कोसळला आणि जागीच ठार झाला.  यानंतर घटनास्थळावरून संयशित प्रमोदने पलायन केले होते.
जत पोलिस या घटनेचा तपास करीत असतानाच प्रमोदचा टेम्पो (एमएच-10,झेड-4667) हा जत येथे आढळून आला. पोलिसांनी हा टेम्पो ताब्यात घेतला असुन संशियत आरोपीला पकडण्यासाठी पथके रवाना केली आहेत. दरम्यान प्रमोद शिवाय अन्य आरोपी आहेत का यांचाही पोलिस शोध घेत आहेत. याचा अधिक तपास  पोलिस फौजदार रणजित गुंडरे हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment