Monday, November 12, 2018

जत तालुक्यात बनावट दारूचा सुळसुळाट

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात बनावट दारूभेसळयुक्त शिंदीची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून दारूचा खरेपणा सिद्ध करण्याची कोणतीच यंत्रणा उपलब्ध नसल्याने याचा गैरफायदा घेतला जात आहेउत्पादन शुल्कची यंत्रणादेखील सक्षम नाहीअपुर्या कर्मचार्यांच्या बळावर कधी तरी अवैध दारू अड्ड्यांवर जुजबी कारवाईचा फार्स केला जात आहे.
आठ दिवसांपूर्वी मिरज तालुक्यातील माळवाडी येथे उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारू निर्मिती अड्ड्यावर छापा टाकलाया कारवाईत त्यांना स्पिरीटची अवैधरित्या आयात करून बनावट दारू तयार केली जात असल्याचे उघड झाले आहेमात्र जतकवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्यात अशा बनावट दारू विक्रीचा सुळसुळाट असल्याचे सांगितले जात आहेया तीनही तालुक्याला लागून कर्नाटक सीमाभाग असल्याने या भागातून मोठ्या प्रमाणात हुबळीमेड आणि बनावट देशी-विदेशी दारू आयात होत आहेशिवाय जत तालुक्यात अवैधरित्या दारूची विक्री करणार्या अड्ड्यांची संख्या मोठी आहेतळीरामांना दारू कोठून आली आहेयाच्याशी काही देणे-घेणे नसते.दारू सहजरित्या उपलब्ध होतेहाच त्यांच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न असतोत्यामुळे याचा गैरफायदा घेऊन तालुक्यात मोठ्या प्रमाणात बनावट दारू विकली जात आहे.
जत तालुक्यात 60 च्या आसपास दारू विक्री आणि बिअरबार आहेतदारूला उठाव नसल्याचे कारण देत अनेकांनी आपली दुकाने बंद केली आहेतमात्र प्रत्यक्षात गावागावांमध्ये दारू सहजरित्या उपलब्ध होत असल्याने ही दारू कोठून येतेअसा सवाल उपस्थित केला जात आहेजत तालुक्याच्या निम्म्या भागाला कर्नाटकचा विळखा आहेयाच्या आड अनेक गुन्हे घडत आहेत.खून,चोर्यामारामार्या त्याचबरोबर बनावट दारूभेसळयुक्त शिंदी,चंदनगांज्या,कापूसवाळू यांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असतेयाकडे पोलिस आणि उत्पादन शुल्क विभाग सोयीस्कर दुर्लक्ष करीत असतातयाला राजकीय आश्रयही लाभत असल्याने प्रत्येकजण यात आपले उखळ पांढरे करून घेत असतो.
जत तालुक्यात उत्पादन शुल्कची यंत्रणा अपुरी आहेशिवाय अवैध काम करणार्या लोकांशीही त्यांचे लागेबांधे आहेतयाच कारणामुळे अनेकदा कारवाईची टीप अवैध अड्डे असणार्या लोकांना मिळते आणि पथकाला रिकाम्या हाताने माघारी परतावे लागतेजतमध्ये मुजोर झालेल्या लोकांनी पथकावरही हल्ला करून उत्पादन शुल्कच्या कर्मचार्यांना जखमी केले होतेनिवडणूक काळात तर बनावट दारू विक्रीला तर उधाण येत असतेच.पण वर्षातले बारा महिने या ठिकाणी बनावट दारूची बिनबोभाट विक्री होत असतेत्यामुळे शेवटी दारूचे सेवन करणार्यांना आपल्या शरीराची काळजी करावी लागणार आहे.

No comments:

Post a Comment