Tuesday, November 27, 2018

चार तलावांत म्हैसाळचे पाणी सोडण्यात येणार

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील  म्हैसाळ  उपसा जलसिंचन योजनेच्या मायथळ ( ता.जत ) येथील मुख्य कालव्यातून संख ,  गुड्डापूर , तिकोंडी व सिद्धनाथ तलाव भरून घेण्याच्या योजनेला राज्याचे जलसंपदा व जलसंधारण मंत्री विजय शिवतारे यांनी तत्त्वतः मान्यता देऊन या कामाच्या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यास परवानगी दिली आहे . या सर्वेक्षण कामाचा शुभारंभ शिवसेना जत  तालुका प्रमुख अंकुश हुवाळे व जिल्हा उपप्रमुख तम्मा  कुलाळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      मायथळ ( ता. जत ) येथील मुख्य कालव्यातून   बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे संख, गुड्डापूर , सिद्धनाथ व तिकोंडी या चार तलावात पाणी सोडण्यात येणार आहे . सविस्तर सर्वेक्षण संकल्पना व अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले असून या कामाची निविदा मागवण्यात आली आहे. येत्या पंधरा दिवसात निविदा निश्चित करण्याचे काम झाल्यानंतर या कामाचे  ठेकेदार प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहेत. त्यामुळे जत तालुक्याच्या पूर्व भागातील वंचित गावांना म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा लाभ होणार आहे . पूर्व भागातील विविध  राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हैसाळ योजनेचे पाणी जत तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांना मिळावे यासाठी सतत आंदोलन , उपोषण व निवेदन देऊन मागणी केली होती . खासदार संजय पाटील व आमदार विलासराव जगताप यानी यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले होते .त्या मागणीला आता यश आले आहे .शासनाच्या या निर्णयामुळे त्याला अंतिम स्वरूप प्राप्त झाले आहे .त्यामुळे पूर्व भागातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.   
          म्हैसाळ योजनेच्या कालव्यातून येणाऱ्या पाण्यामुळे  माडग्याळ ,  गुड्डापूर , संख , दारीबडची , तिल्याळ, सिद्धनाथ , मोटेेवाडी , तिकोंडी हे तलाव भरण्यासाठी यापुढील काळात प्रयत्न होणार आहेत .
 सर्व्हेक्षचण कामाच्या उद्घाटन प्रसंगी  सिध्दू गायकवाड , नाना कुटे , संभा जाधव , ज्ञानेश्वर कुटे , सुखदेव सूर्यवंशी , जेटलिंग कोरे , महादेव माळी , सीताराम जाधव , जेटयाप्पा कोरे , लिंबाजी माळी ,सुखदेव माळी , हरिचंद्र कांबळे , अमोघसिद्ध शेंडगे ,जोतीबा जाधव ,  धोंडीबा बोरकर , पिंटू नेमाने  ,अप्पासाहेब थोरात , भा

1 comment:

  1. उमदी परिसरातील गावांचे काय ? उटगी सोन्याळ जा.बोबलाद सोनलगी सुसलाद हळ्ळी बालगाव बोर्गि इ गावाना कोणत्याही योजनेत समावेश नाही

    ReplyDelete