Tuesday, November 13, 2018

जतमध्ये जुगार अड्यावर छापा : चार जणांना अटक

जत,(प्रतिनिधी)-
शहरातील महाराणा प्रताप चौकात जुगार अड्यावर छापा टाकून जत पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून रोख ४ हजार ४३० रूपये जप्त केले आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता ही जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक भवड यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. याची नोंद जत पोलिस ठाण्यात झाली आहे. 
    बाळासो पंढरी शिंदे (वळसंग), विनोद बाळासाहेब पवार, रमेश रावसाहेब पवार, विठ्ठल बाबु कांबळे आदी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर शकील शेख हा फरार झाला आहे. याची नोंद झाली असून याचा अधिक तपास विजय वीर करत आहेत.

No comments:

Post a Comment