Wednesday, November 21, 2018

बसपाच्या तालुकाध्यक्षपदी तानाजी व्हनखंडे


जत,(प्रतिनिधी)-
बहुजन समाज पार्टीच्या जत तालुकाध्यक्षपदी जत येथील तानाजी देवेंद्र व्हनखंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.
जत येथे पार पडलेल्या बहुजन समाज पार्टीच्या कार्यकारणीची बैठकीत  श्री.व्हनखंडे यांची निवड बिनविरोध करण्यात आली. त्याचबरोबर शहराध्यक्षपदी रोहन वसंत साळे यांची निवड करण्यात आली. बसपचे जिल्हा उपाध्यक्ष अतुल कांबळे यांनी त्यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार केला. यावेळी बोलताना श्री.व्हनखंडे म्हणाले की, राज्य चर्मकार महासंघाच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक कार्यात सहभाग राहिला आहे. यापुढेही बसपा या पक्षाच्या माध्यमातून आपले सामाजिक क्षेत्रातील काम अव्याहरतपणे राहिलच, त्याचबरोबर पक्ष वाढीसाठी आणि बळकटी आणण्यासाठी प्रयत्न राहणार आहेत. पक्षाची मजबूत बांधणी करण्यासाठी तालुका दौरे करून संघटना मजबूत करण्यावर आपला भर असणार आहे. या माध्यमातून आपल्याला लोकांचे प्रश्न सोडवण्यास संधी मिळाली आहे.

No comments:

Post a Comment