Monday, December 3, 2018

‘2.0’ची चार दिवसांत 400 कोटींची कमाई


जत,(प्रतिनिधी)-
 रजनीकांतच्या फॅनसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे त्यांचा चार दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला 2.0 हा चित्रपट सिनेमागृहात गर्दी खेचत आहे. तब्बल पाचशे कोटीच्या या चित्रपटाबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मात्र या चित्रपटाने आपला गल्ला जमवायला सुरुवात केली आहे, अशी बातमी येऊन थडकली आहे. चार दिवसात या चित्रपटाने तब्बल चारशे कोटींचा गल्ला जमवला आहे.

29 नोव्हेंबर रोजी रजनीकांत आणि अक्षय कुमार यांची मुख्य भूमिका असलेला ‘2.0’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि पहिल्या शोपासूनच चाहत्यांनी तुफान गर्दी केली. हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘2.0’ने अवघ्या चार दिवसांत जगभरात तब्बल 400 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ‘लायका प्रॉडक्शन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटद्वारे ही माहिती दिली आहे. ‘2.0’ हा चित्रपट भारतातील सर्वांत महागडा आणि आशिया खंडातील सर्वाधिक बजेटचा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटातील व्हीएफएक्सवर तब्बल 550 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या चित्रपटासाठी जगभरातील 3000 हून अधिक तंत्रज्ञांनी काम केलं असून त्यापैकी 1000 व्हीएफएक्स कलाकार आहेत. ‘तंत्रज्ञान आणि कथा यांचा उत्तम मेळ ‘ 2.02 मध्ये घातला आहे. या चित्रपटात सामाजिक संदेशही दडला आहे. म्हणूनच हा चित्रपट यशस्वी होईल असा मला विश्वास वाटतो. हा चित्रपट नक्कीच सिनेसृष्टीचा अभिमान आहेअसे म्हणत रजनीकांत यांनी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मनोगत व्यक्त केलं होतं. 2.0 हा चित्रपट जगभरातील 10 हजारांहून अधिक स्क्रिन्सवर तामीळ, हिंदी, इंग्रजी, तेलुगू भाषेत प्रदर्शित झाला आहे.

No comments:

Post a Comment