Thursday, December 6, 2018

आंतरजिल्हा बदलीमुळे 20 पोलीस कर्मचारी वाढणार


जत,(प्रतिनिधी)-
सांगली शहर व जिल्ह्यासाठी आंतर जिल्हा बदलीद्वारे 17 पोलीस कर्मचारी मुंबई येथून येत असून त्यांना तेथून नुकतेच कार्यमुक्त करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या बदलीने कुटुंबापासून दूर गेलेल्या कर्मचार्यांना दिलासा मिळाला आहे.
सांगली जिल्ह्यातील मूळचे असलेले पोलीस कर्मचारी जे सध्या मुंबई येथे कार्यरत होते.
प्रामुख्याने यामध्ये पती-पत्नी एकत्रीकरण तसेच कुटुंबातील आई-वडील आजारी असलेल्या कर्मचार्यांना या बदलीच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाने कुटुंबाच्या जवळ राहून सेवा करण्यासाठी येण्याची संधी दिली आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यामधील 221 पोलीस कर्मचार्यांचा यामध्ये समावेश आहे. आंतर जिल्हा बदलीने येणार्या कर्मचार्यांची संख्या पुढीलप्रमाणे ः सांगली-20, सोलापूर-ग्रामीण-10 व शहर -7, पुणे - 55, जळगाव-18, अहमदनगर-10, नंदुरबार-7, वाशिम-6, कोल्हापूर-17, पालघर-3, नाशिक-2, धुळे-4, वाशिम-5, कोल्हापूर-15, औरंगाबाद-13, सातारा-1, ठाणे-10, बीड-5, बुलढाणा-1, हिंगोली-1 व इतर अन्य असे 19 जिल्ह्यात 221 पोलीस कर्मचारी या बदली प्रक्रियेतून येणार आहेत. मुंबई येथील पोलीस आयुक्त सुबोध जैस्वाल यांनी बदली झालेल्या कर्मचार्यांना 1 डिसेंबरपासून कार्यमुक्त केले असून पहिल्या टप्प्यात 1 ते 50, दुसर्या टप्प्यात 51 ते 200 तर तिसर्या टप्प्यात 201 ते 221 कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी जातील, असे पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले.No comments:

Post a Comment