Thursday, December 6, 2018

म्हैसाळ योजनेसाठी जत तालुक्यातून 20 लाख पाणीपट्टी वसूल

जत,(प्रतिनिधी)-
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे जत तालुक्यात विसर्ग सुरू असून सध्या 250 क्यूसेक वेगाने पाणी येत आहेमात्र पाणी पुढे सांगोल्याला जात असल्याने पहिल्यासारखीच स्थिती आहे.जत शहराला पाणी पुरवठा करणार्या बिरनाळ तलावात पाणी सोडण्याची मागणी होत आहे.

आतापर्यंत जत तालुक्यातून 20 लाख रुपयांची पाणीपट्टी वसूल झाली आहेजत तालुक्यातील लाभक्षेत्राला दुष्काळी झळा सर्वाधिक बसतात.पण वितरण व्यवस्था अपुरी आहेयेथील उभ्या पिकांची स्थितीउपलब्ध वितरण व्यवस्थेची स्थितीपाण्याची शेतीसाठी मागणी आणि वसुली यांचा विचार करता विसर्ग ठेवला जातो.यातून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार काही तलावात पिण्याच्या पाण्यासाठी सोडलेले पाणी याचेही गणित घालण्यात आले आहेयावर्षी आमदार विलासराव जगताप यांनी जतला विसर्ग वाढवून देण्याची जोरदार मागणी केली होती.त्यानुसार गतवर्षीच्या तुलनेत 100 क्युसेकने विसर्ग वाढवून देण्यात आला आहे.
गतवर्षी सुरुवातीला 100 तर नंतर 150क्युसेकपर्यंत विसर्ग आणला होतायंदा 150वरून 250 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहेमात्र या तालुक्यातून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात पाणी सोडण्यात आल्याने पाण्याचा वेग हा पहिल्यासारखाच आहेअजून जत तालुक्यातून अनेक तलाव भरायचे आहेतजत शहराला पाणी पुरवठा करण्यात येणार्या बिरनाळ तलावात पाणी सोडण्यात आलेले नाहीगतवर्षी याच तलावातून संपूर्ण तालुक्याला टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला होताउन्हाळा अद्याप असला तरी आताच पाणीटंचाई तीव्र झाली आहेत्यामुळे या तलावात पाण्याचा साठपा करण्याची गरज आहेत्यामुळे या तलावात पानी सोडण्याची मागणी होत आहे.

1 comment: