Monday, December 3, 2018

जतेत कालव्याच्या कामात अडथळा 40 जनावर गुन्हा

जत,(प्रतिनिधी)- जत तालुक्यातील कंठी हद्दीतील क्र. 6, 33/300 मि. या कालव्याच्या उजवीकडील भराव भोडल्याने रघुनाथ गोविंद नरळे, शरद हिप्परकर, महावीर नरळे यांच्या सह चाळीस जणांवर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत म्हैसाळ पंप गृह विभाग दोनचे कार्यकारी अभियंता विजय पांडुरंग पाटील यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वरील चाळीस शेतकर्‍यांनी शनिवारी दि. 1 डिसेंबर रोजी पहाटे 4 वाजल्यापासून आज रविवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत कंठी हद्दीतील क्र. 6, 33/300 मि. या कालव्याच्या उजवीकडील भराव फोडले. 12 हजार द. ल. घ. फ. पाणी वाहून गेले. याची दोन लाख चार हजार इतकी किंमत असून बंधाऱ्याचे नुकसान असे दोन लाख 29 हजारांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. अधिक तपास जत पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आप्पासो कत्ती हे करत आहेत.

No comments:

Post a Comment