Saturday, December 29, 2018

‘थापाड्या’ चित्रपट 4 जानेवारीला प्रदर्शित


सांगली,(प्रतिनिधी)-
 मानसी फिल्मस प्रॉडक्शन निर्मित मास्क ग्रुप प्रस्तुतथापाड्याहा चित्रपट 4 जानेवारी रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती चित्रपटाचे निर्माते भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या चित्रपटात अभिनय सावंत, बार्शीची मानसी मुसळे, सोनाली गायकवाड, बिंद्रा पारेख, मोहन जोशी या प्रमुख कलाकारांसह कमलाकर सातपुते, सुरेखा कुडची, दीपक करजगीकर, सुनील गोडबोले, विनीत भोंडे, संतोष रासने, प्रदीप कोथमिरे, अण्णा साळुंखे यांच्या भूमिका पाहावयास मिळणार आहेत. वास्तूतज्ज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर हे विशेष भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात एकूण 5 गाणी असून त्यामध्ये तीन लावण्यांचा समावेश आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई, हैदराबाद, सासवड, पुणे, पिंपरी-चिंचवड आदी ठिकाणी झाले आहे. चित्रपट निर्मितीसाठी सुमारे पावणेतीन वर्षे परिश्रम करावे लागल्याचे निर्माते भोईर यांनी सांगितले.
या चित्रपटात अभिनय करताना आपल्या लावणीचा कस लागल्याचे अभिनेत्री मानसी मुसळे म्हणाली. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने वेगळाच अनुभव आल्याचे तिने नमूद केले. विजयकुमार साळुंखे म्हणाले, हा चित्रपट दर्जेदार स्वरूपाचा असून त्यामध्ये मानसीसारखी लावणी कलावंत चित्रपट अभिनेत्री म्हणून समोर येत आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. या चित्रपटाची कथा-संकल्पना भोईर यांची तर पटकथा समीर काळभोर यांची आहे. नृत्य दिग्दर्शन फुलवा खामकर, निकिता मोघे यांनी केले आहे. गायक आदर्श शिंदे, बेला शेंडे, आनंदी जोशी, सायली पंकज यांनी पार्श्वगायन केले आहे.‘थापाड्याथापा मारण्यावर आधारित हा मनोरंजनात्मक प्रबोधन करणारा चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास निर्माते भोईर यांनी व्यक्त केला. यावेळी मानसी मुसळे, अभिनय सावंत, दिग्दर्शक अजित शिरोळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment