Tuesday, December 4, 2018

शासनाच्यावतीने 7, 8 डिसेंबरला ग्रंथोत्सव


सांगली,(प्रतिनिधी)-
 शासनाच्या ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 7 8 डिसेंबर रोजी सांगलीत ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने ग्रंथ जत्रेचे देखील नियोजन केले असून याचे उद्घाटन पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी दिले आहेत.

दुपारी 3 वाजतावाचनातून विश्वाकडेया विषयावर परिसंवाद होणार असून अध्यक्षस्थानी सांगली अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष बापूसाहेब पुजारी आहेत. यामध्ये दि. बा. पाटील, नीलम माणगावे, प्रा. बी. डी. पाटील आदी सहभागी होणार आहेत. सायंकाळी 4 वाजता कविसंमेलन होणार आहे. यामध्ये अभिजित पाटील, मनिषा पाटील अर्चना मुळे, वसंत पाटील, नामदेव भोसले, वर्षा चौगुले, नंदू गुरव, अनिल पाटील आदी सहभागी होणार आहेत. अध्यक्षस्थानी दयासागर बन्ने आहेत. शनिवारी सकाळी साडेदहा वाजतामाझ्या लेखन प्रेरणाया विषयावर परिसंवाद होणार आहे. प्रा वैजनाथ महाजन अध्यस्थानी असून यामध्ये डॉ. दिलीप शिंदे, प्रमोद चौगुले, अरविंद लिमये, बापू जाधव, प्रदीप पाटील सहभागी होणार आहेत. दुपारी 3 वाजताग्रंथोत्सव ः का व कशासाठी?’ या विषयावर परिसंवाद असून यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी महेश चोथे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांचा सहभाग आहे. अध्यक्षस्थानी आयुक्त रवींद्र खेबुडकर आहेत.

No comments:

Post a Comment