Wednesday, December 5, 2018

मळणगावात 8, 9 डिसेंबर रोजी चारुता सागर साहित्य महोत्सव


जत,(प्रतिनिधी)-
 नागीण’,’नदीपारमामाचा वाडाया कथासंग्रहातील कथांनी मराठी सारस्वताला नवा आयाम देणारे मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील साहित्यिक स्व. चारुतासागर ऊर्फ दिनकर दत्तात्रय भोसले (गुरुजी) यांच्या 89 व्या जयंतीनिमित्त येथील चारुता सागर सांस्कृतिक सोशल फौंडेशनच्या वतीने दि. 8 9 डिसेंबर रोजी दोन दिवस चारुता सागर साहित्य महोत्सवाचे आयोजन केले आहे.

साहित्य रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन फौंडेशनच्यावतीने राजेंद्र दिनकर भोसले यांनी केले आहे. शनिवार, दि. 8 रोजी सकाळी ग्रंथदिंडी व कथा अभिवाचन स्पर्धा होणार असून सायंकाळी 5 वाजता निमंत्रित व नवोदित कवींचे संमेलन होणार आहे. यामध्ये शिक्षण विस्ताराधिकारी विश्वासराव साबळे, प्रा. अनिलकुमार पाटील, गोपाळ पाटील, मनीषा पाटील, सुहास पंडित, धनाजी पाटील व विकास चव्हाण सहभागी होणार आहेत. त्यानंतर प्रा. एच. बी. तांबोळी यांच्यामी मनातलाचारोळी संग्रहाचे प्रकाशन होणार आहे. सायंकाळी 7 वाजता नागठाणे येथील कथाकार हिंमत पाटील यांचा कथाकथन कार्यक्रम होणार आहे.
रविवार, दि. 9 रोजी सायंकाळी 5 वाजताचारुता सागर यांचे कथाविश्व समजून घेतानायावर प्रा. वसंत केशव पाटील यांचे अध्यक्षीय मार्गदर्शन होणार असून सायंकाळी 7 वाजताआई ः एक संस्काराचे अमृतया विषयावर प्रा. वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाने महोत्सवाचा समारोप होणार आहे.

No comments:

Post a Comment