Saturday, December 1, 2018

जतमध्ये धावण्याच्या स्पर्धेचे उद्घाटन


जत,(प्रतिनिधी)-
 सीएम चषक स्पर्धेत धावण्याच्या महिला व पुरुष स्पर्धेचे उद्घाटन जत तालुका भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. रवींद्र आरळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुङोङगी, राजीव यादव, गुरुशांत माळी, राजेंद्र आरळी, अजित पाटील, पांडुरंग सावंत उपस्थित होते. शनिवारी धावण्याच्या स्पर्धेला सुरुवात झाली.
स्पर्धेसाठी जत पाचशेच्यावर खेळाडूंनी सहभाग नोंदविला. डॉ. रवींद्र आरळी म्हणाले, या स्पर्धेमध्ये क्रिकेट. हॉलीबॉल. कबड्डी. खो-खो, कुस्ती, धावणे, गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment