Saturday, December 1, 2018

व्हसपेठच्या जळितग्रस्त कुटुंबाला ग्रामपंचायतीकडून मदत


जत,(प्रतिनिधी)-
 व्हसपेठ (ता. जत) येथील शिवाजी गायकवाड यांचे घर जळीत झालेले आहे. त्यांना मदत म्हणून व्हसपेठ ता. जत ग्रामपंचायतकडून संसार उपयोगी वस्तू, भांङी व्हसपेठ गावाचे सरपंच रामचंद्र साळुंखे, उपसरपंच संजय पांढरे, ग्रामसेवक हुशेन पाटील याच्या हस्ते देण्यात आले. व्हसपेठ येथील शिवाजी गायकवाड यांचे घर गॅस स्फोटाने 29 रोजी उध्वस्त झाले होते. संसार उघड्यावर पडला होता. त्यांना मदतीचा हात म्हणून व्हसपेठ ग्रामपंचायत कडून संसार उपयोगी साहित्य देण्यात आले.
गायकवाड कुटुंबयांनी ग्रामपंचायत चे आभार मानले यावेळी, संगणक परिचालक कैलास रणदिवे आणि नेते बिराप्पा निळे, आकाराम गायकवाड, आदिलशाह पाटील, कृष्णा लेंगरे, नामदेव तुराई, ग्रामपंचायत सदस्य शारदा गायकवाड, अंबाजी वगरे, तुकाराम चौगुले, मज्जीद नदाफ, आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment