Monday, December 10, 2018

बेरोजगारांचे सांगली जिल्हा परिषदेकडील 'मेगा भरती'जाहिरातीकडे लक्ष

जि. प.कडील कर्मचार्‍यांची ५४१ पदे रिक्त
जत,(प्रतिनिधी)-
जिल्हा परिषदेकडील वर्ग 3 कर्मचार्‍यांची रिक्त पदे 541 आहेत. यापैकी दि. 31 डिसेंबर 2018 अखेरची रिक्त पदे 520, तर दि. 1 जानेवारी 2019 ते दि. 31 डिसेंबर 2019 या कालावधीतील रिक्त पदे 21 आहेत. रिक्त पदांची माहिती शासनाला सादर करण्यात आहे. शासनस्तरावरून ‘मेगा भरती’च्या हालचाली सुरू आहेत. जिल्हा परिषदेकडील भरतीच्या जाहिरातीकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

   शासनाने ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषदांकडील 23 संवर्गातील रिक्त पदांची माहिती मागविली आहे. सांगली जिल्हा परिषदेकडे वरिष्ठ सहायक लेखा, विस्तार अधिकारी कृषी, कनिष्ठ सहायक (लिपीक),  विस्तार अधिकारी पंचायत, कनिष्ठ लेखाधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, कनिष्ठ यांत्रिकी या संवर्गात रिक्त पदे नाहीत. कनिष्ठ लेखाधिकारी संवर्गातही 2 पदे जादा आहेत. सरळसेवा भरती व पदोन्नतीतून भरती याचे प्रमाण बदलले असल्याने कनिष्ठ सहायक (लिपीक) या संवर्गात 40 पदे जादा झाली आहेत.
शासनस्तरावरून ‘मेगा भरती’च्या हालचाली सुरू आहेत. शासनाने जिल्हा परिषदांकडून रिक्त पदांची माहिती मागविली आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांच्या भरतीबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी संकेत दिलेले आहेत. त्यामुळे भरतीची जाहिरात केव्हा निघणार याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षण लागू असल्याने मराठा उमेदवार एसईबीसी दाखले मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.
दि. 31 डिसेंबर 2019 अखेर संवर्गनिहाय रिक्त पदे     
औषर्ध निर्माता 13,  कनिष्ठ अभियंता यांत्रिकी 1, 
आरोग्य सेवक पुरूष 183 ,  कनिष्ठ सहायक लेखा                  5 , आरोग्य सेवक महिला 248 , प्रयोगशाळा तंत्रज्ञ                      2 ,कनिष्ठ आरेखक  3 ,  विस्तार अधिकारी शिक्षण         5 ,अंगणवाडी पर्यवेक्षिका 12 ,विस्तार अधिकारी सांख्यिकी  7 ,वरिष्ठ सहायक लिपीक   3, लघुलेखक                                  1,पशुधन पर्यवेक्षक   3 ,  कंत्राटी ग्रामसेवक 18 ,     
कनिष्ठ अभियंता बांधकाम 11, आरेखक ग्रापापु          1,कनिष्ठ अभियंता पा.पु. 5 ,स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम  20   

No comments:

Post a Comment