Saturday, December 1, 2018

नाना गोफ यांनी शाळेला दिला स्पीकर संच


जत,(प्रतिनिधी)-
 आई-वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ करेवाडी (को. बो.) येथील प्राथमिक शाळेला पोलिस कर्मचारी नाना गोफ यांनी स्पीकर संच, साहित्य दिला. यामुळे शाळेचा परिपाठ चांगला होण्यास मदत झाली आहेप्राथमिक शाळेतील लहान मुलांना बालवयातच कलागुणांना वाव मिळावा. व्यासपीठावर बोलण्याचे, गाण्याचे मुलांमध्ये धाडस वाढावे यासाठी मुंबई येथे पोलीस सेवेत असणार्या नाना गोफने यांचा उपक्रम आदर्शवत असल्याचे प्रतिपादन भाजपा ओबीसी सेलचे जत तालुकाध्यक्ष नागनाथ मोटे यांनी केले.
जत तालुक्यातील करेवाडी(को.बो.)या जिल्हा परिषद मराठी शाळेला स्पीकर संच, साहित्य प्रदान कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते. या कार्यक्रमास रमेश जगताप, सलीम टपाल, सदाशिव कोळेकर, वसंत कारंडे, संभाजी जगताप, सुभाष दुधाळ, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. मोटे म्हणाले, करेवाडीतील गोफने कुटुंबीयातील मुंबई पोलीस सेवेत असणारे नाना गोफने, दशरथ गोफने हे सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. गोफने कुटूंबियांचा इतरांनाही घ्यावा असे आवाहन मोटे यांनी केले. आयोजन दशरथ गोफने, मायाप्पा गोफने यांनी केले.

No comments:

Post a Comment