Sunday, December 9, 2018

(युजफूल गॅजेट्स) फुल फेस गॅस मास्क


आजकाल प्रदूषण किती वाढलं आहे,याची आपल्याला कल्पना आहे. दिल्लीसारख्या ठिकाणी तर हवेच्या प्रदूषणाने अगदी परिसीमाच ग़ाठली आहे. इथे म्हणे हवेतल्या प्रदूषणाने वर्षाला 34 लोकांचा मृत्यू होत आहे. अन्य आजारांपेक्षा प्रदूषणामुळे मृत्यू पावणार्यांची संख्या मोठी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रदूषणाचा मानवी शरीराला किती मोठा धोका आहे,याची आपल्याला कल्पना आहे. दिल्ली शहरच नव्हे तर मुंबई,कोलकाता,बंगळुरू, चेन्नईसारखी मोठी महानगरे तर सोडाच आता जिल्हा आणि तालुक्याची ठिकाणेही हवेच्या प्रदूषणाच्या कचाट्यात सापडली आहेत. धूळ, प्रदूषित हवा फुफ्फुसात जाऊन त्याचे आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे यापासून सुटका करून घेण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. पण एक असे गॅजेट आहे, जे एक हजार शंभर रुपयांना उपलब्ध आहे

हा मास्क अनेक प्रकारे उपयोगाचा आहे. या मास्कसोबत गॉगल जोडण्याची सुविधा देण्यात आली आहे. हा मास्क तुम्हाला फॉर्मेल्डिहाइड, गॅसोलिन,इथर, स्प्रे-पेंट, ऑइल, पॉलिश इत्यादी रासायनिक पदार्थांच्या धोक्यापासून तुम्हाला वाचवू शकतो. हा हलका आणि आरामदायी आहे. याचे फिल्टर बॉक्स सहजरित्या रिप्लेस होऊ शकतात.

No comments:

Post a Comment