Monday, December 3, 2018

शिक्षणाच्या वारीचे जतमधून शंभर शिक्षक जाणार


जत,(प्रतिनिधी)-
 शिक्षण क्षेत्रातील नवे प्रयोग; तसेच होत असलेला तंत्राचा वापर सर्वांपर्यंत पोचावा, यासाठी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात येत असलेलाशिक्षणाची वारीहा उपक्रम दि. 10 ते 12 डिसेंबरला कोल्हापुरात तपोवन मैदानात आयोजित करण्यात आला आहे. यासाठी जत तालुक्यातून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांसह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी असे शंभरजण दोन बसगाड्यांमधून जाणार आहेत.

कोल्हापुरात होणार्या या शिक्षणाच्या वारीचे उदघाटन ता. 10 रोजी सकाळी 10.30 वाजता उद्घाटन होणार आहे. शिक्षण सचिव वंदना कृष्ण आणि शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी हे प्रमुख उपस्थित असणार आहेत. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे हे चौथे वर्षे आहे. यंदा तीन दिवसाच्या या उपक्रमात पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा सात जिल्ह्यांतील शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांचा समावेश आहे. या वारीत विविध विषयांचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी विषयानुरूप स्टॉलची निवड केली आहे. सुमारे 250 स्टॉलधारक शिक्षक आपल्या स्टॉलची उभारणी करणार आहेत. या वारीत दि. 10 रोजी कोल्हापूर, सातारा, दि. 11 रोजी सांगली, सोलापूर व पुणे तर दि. 12 रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथील शिक्षक पालक भेट देतील. दुपारी 2 नंतर सायंकाळपर्यंत वारी सर्वांना पाहण्यासाठी खुली राहणार आहे.

No comments:

Post a Comment