Thursday, December 6, 2018

सांगलीच्या पूनम कणसेचे ‘तेरे प्यार में’ बॉलीवूडपटातून पदार्पण जत,(प्रतिनिधी)-
सोलापूर आणि सांगलीच्या कलाकारांचा भरणा असलेल्या चंदा प्रोडक्शन निर्मिततेरे प्यार मेंहा सोलापूरच्या इतिहासातील पहिला बॉलिवूड हिंदी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून लवकरच हा चित्रपट महाराष्ट्रासह कर्नाटक व तेलंगणा राज्यातही प्रदर्शित केला जाणार आहे.

 चित्रपटचे निर्माते, दिग्दर्शक, लेखक व मुख्य अभिनेते जुनेद चंदा आहेत. या चित्रपटाचे सोलापूर, विजापूर व हैदराबाद येथील तैमूर स्टुडिओत चित्रीकरण करण्यात आले असून 130 कलावंतांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यातील सुमारे 75 कलावंत हे सोलापूरचे आहेत. या चित्रपटात चार गाणी असून ती गौतमी जितुरी, सुप्रिया सोरटे, विनायक बोकेफोडे व संदेश या स्थानिक कलावंतांनी गायिली आहेत. सांगलीच्या पूनम कणसे (बुलबुल) या प्रथमच या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून दुहेरी भूमिका साकारत आहेत. संगीत सोलापूरचे धनंजय जब्बार यांनी दिले असून गाणी सोलापूरचेच सिराज शेख व हैदराबादचे मोहम्मद उमर यांनी लिहिली आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण परशुराम मिसालोलू यांनी केले आहे. प्रेमावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांना निश्चित आवडेल, असा विश्वास पूनम कणसे यांनी व्यक्त केला आहे. या चित्रपटात संतोष कासे, पूनम कणसे, गौतमी जितुरी, जब्बार मुर्शद, विनायक बोकेफोडे यांच्याही भूमिका आहेत. 

No comments:

Post a Comment