Saturday, December 8, 2018

फर्टिलायझर अॅण्ड सीडस् असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजेंद्र कन्नूरे


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुका फर्टिलायझर अॅण्ड सीडस् असोसिएशनची नुकतीच जत येथे  बैठक झाली.यावेळी संघटनेने नव्याने निवडी सर्वानुमते जाहीर करण्यात आला. तालुका अध्यक्षपदी राजाभाऊ कन्नूरे तर सचिवपदी अर्जुन सवदे यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली.

यावेळी  उपाध्यक्षपदी परशुराम सांगोलकर  (शेगाव), रोहन चव्हाण( उमदी), सहसचिव सत्यवान मद्रेवार, खजिनदार म्हणून पांडूरंग शिंदे, कार्याध्यक्ष म्हणून सदाशिव जाधव यांचीही निवड करण्यात आली. राहूल माने, म्हाळाप्पा जावीर ,महादेव माळी ,मल्लकू मल्लाड, अशोक छत्रे,धानाप्पा ऐनापुरे,सिध्दू रसाळ ,विनोद हलकुडे , बसवराज बाबान्नावर उपस्थित होते.  या वेळी नूतन अध्यक्ष राजाभाऊ कन्नुरे म्हणाले , खत विक्रेते, बि बियाणे , औषधे विक्रेते यांच्यावर येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी पुढाकार घेवू असे सांगितले. या बैठकीस लिंबाजी सोलनकर, बसवराज राचगोंड यांच्यासह  कृषी दुकानदार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment