Sunday, December 2, 2018

महादेव बुरुटे यांना 'दिव्यांग प्रेरणा' पुरस्कार

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील शेगाव येथील कवी, लेखक महादेव बी. बुरुटे यांना सांगली जिल्हा परिषदेचा यंदाचा 'दिव्यांग प्रेरणा पुरस्कार २०१८' जाहीर करण्यात आला आहे. तीन डिसेंबर या जागतिक अपंग दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे वितरण सोमवारी सकाळी दहा वाजता डेक्कन मॅन्युफॅक्चर्स हॉल, माधवनगर रोड, सांगली येथे होणार असल्याचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिशन देवढे यांनी एका अधिकृत पत्राद्वारे कळवले आहे.

ग्रामीण शेतकरी कुटुंबातील श्री. बुरुटे हे लहानपणापासून दोन्ही पायांनी पूर्णतः अपंग असून त्यांचे आकाशवाणी तसेच विविध माध्यमातून कथा, कविता, लेख, आत्मलेख, परिचय, पुस्तक परीक्षणे इत्यादी प्रकारचे भरपूर लेखन आणि 'रानपालवी', 'ऋतुरंग' हे  काव्यसंग्रह तसेच 'साधुची युक्ती' आणि इतर बालकथा ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते अनेक राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराने सन्मानित आहेत. त्यांची अन्य काही पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.

No comments:

Post a Comment