Thursday, December 6, 2018

केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक जतला आलेच नाही


दुष्काळी जनतेची क्रुर थट्टा 
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात दुष्काळाने थैमान घातले असताना आणि राज्य सरकारने दुष्काळी तालुका जाहीर केला असतानाही दीड महिना उलटला तरी सरकार व प्रशासन याबाबत गंभीर दिसत नाहीत. कोणतीही उपाययोजना होत नसल्याने जतवासीयांमध्ये संताप व्यक्त होत असताना केंद्रीय पाहणी पथकही जतला न येता परस्पर आटपाडीला गेल्याने दुष्काळी जनतेची क्रूर चेष्टा चालवली असल्याचा आरोप होत आहे.

  जत तालुक्यातील तब्बल  ४२ गावांचा  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना आणि पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करण्याची मागणी असतातना फक्त पाच गावांना टँकर सुरू करण्यात आले आहे. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण हिंडावे लागत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर असताना शासन आणि प्रशासन उपाययोजना करायला तयार नाही. त्यामुळे तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे.
रोजगाराचा प्रश्न सुटलेला नाही. लोक स्थलांतर करीत आहेत. तालुका व  जिल्हा प्रशासनाने दुष्काळी जनतेची क्रुर थट्टा चालवली आहे.
   अशी भीषण परिस्थिती असताना  आज दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी  केंद्रीय पथक जत तालुक्यात येणार होते, पण तेही जत तालुक्यात न येता तालुक्याच्या सीमेवरून आटपाडी कडे रवाना झाले. केंद्रीय पथकाने सुध्दा दुष्काळी जनतेच्या जखमेवर मीठ चोळून दुष्काळी पाहणी दौरा केला आहे,असा आरोप होत आहे.
 सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे म्हणाले, जत तालुक्यातील शेतकरी शेळ्या मेंढ्या व जनावरे  पशुपालन करणारे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत शेतकरी पशुपालकांच्या जनावरांच्या चारयाचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे सरकार व प्रशासन याबाबत गंभीर दिसत नाही तालुक्यातील पशुधन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे पंधरा दिवसात शेळ्या मेंढ्या सहित जनावरांसाठी चारा डेपो अथवा थेट अनुदान याची व्यवस्था करावी अन्यथा पशुपालक शेतकरी बांधवांना सोबत घेऊन जनावरे तहसिल कार्यालयमध्ये सोडण्यात येतील याची जबाबदारी शासनाची व प्रशासनाची राहिल.


No comments:

Post a Comment