Tuesday, December 11, 2018

माडग्याळ येथे बीअर बारवर तीन लाखांचा दरोडा


तलवार व लोखंडी रॉडचा धाक दाखवून कामगारास मारहाण
जत,(प्रतिनिधी)-
 माडग्याळ (ता. जत) येथे हॉटेल युवराज बीअरबार फोडून दरोडा टाकण्यात आला. हॉटेलमधील कामगार झोपेत असताना सात दरोडेखोर शटर उचकटून हातात लोखंडी रॉड व तलवार घेऊन हॉटेलमध्ये आले आणि मारहाण करून मालक बापू नानासाहेब सावंत (वय 55), कामगार संपत बोरकडे यांच्याजवळ येऊन तलवार व लोखंडी रॉडचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. हॉटेलच्या स्टोअररूममधील तीन लाख किमतीचा माल जबरदस्तीने चोरून नेऊन हॉटेलवर दरोडा घातला. यावेळी सात अनोळखी संशयितांविरुद्ध फिर्याद हॉटेलचे मालक बापू सावंत यांनी उमदी पोलीस ठाण्यात दिली. यावरून संशयित दत्ता रामू चव्हाण व दिगंबर रामू चव्हाण यांना पकडण्यात आले.

 माडग्याळ बस थांब्यालगतच उमदी रस्त्याच्या कडेला हे हॉटेल आहे. यावेळी शटर खोलूनदरोडेखोरांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. यावेळी त्याच्या हातात तलवार व लोखंडी रॉड अशी हत्यारे होती. त्यावेळी एका दरोडेखोरांनी बापू सावंत व कामगारास मारहाण करायला सुरुवात केली. नंतर दरोडेखोरांनी हॉटेल मालक बापू सावंत व कामगारांस धमकी देऊन पैशांची मागणी केली. त्यानंतर एकाने कॅश काऊंटरचे लॉक तोडून आतील 18,000 रोख रक्कम काढून घेतली. त्यानंतर काही दरोडेखोर स्टोअर खोलीकडे गेले व त्या खोलीचे कुलूप तोडण्यात आले. विविध कंपन्यांचे विदेशी दारूचे बॉक्स स्टोअर रूममधून बाहेर घेऊन गेले. विविध विदेशी कंपनीचे चाळीस दारूचे बॉक्स 2 लाख 8 हजार व काऊंटरमधील 18 हजार रुपये रोख असा एकूण 2 लाख 98 हजार रुपयांचा माल जबरदस्तीने चोरून नेला. सर्व दरोडेखोर बाहेर आले व त्यांनी हॉटेल मालकास व कामगारांस ठार मारण्याची धमकी देण्यात आली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी एलसीबी सांगली, फिंगरप्रिंटचे अधिकारी बीडीडीएस सांगली, सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती कोलेकर डी. ए यांनी भेट दिली.
सोमवाीर रात्री पोलिस पथक गस्त घालत असताना संशय आल्याने व्हसपेट डोंगर ते कोळगिरी क्रॉसपर्यंत पाठलाग केला असता चोरट्यांनी चोरलेल्या दारूच्या बाटल्या गाडीवर फेकल्या व गाडीचे नुकसान केले. मात्र धाडसाने पाठलाग सुरू ठेवला पण कोळगिरी क्रॉसला चोरट्यांची बोलेरो (एमएच 10 एम ए 2936) पलटी झाली. गाडीतील 7 पैकी 5 जण पळून जाण्यात यशस्वी झाले. दिगंबर रामू चव्हाण व दत्तात्रय रामा चव्हाण या दोघांना पकडून उमदी पोलीस स्टेशनच्या हाती सुपुर्द केले. तासाभरात दीड लाख गोळा पोलीस निरीक्षक भगवान शिंदे लगेचच माडग्याळ मधील सरपंचला बोलवून सीसीटीव्ही कॅमेर्यासाठी गावातून दीड लाख तासाभरात गोळा करून ऑर्डरही देऊन टाकली. त्यामुळे कोणतीही घटना घडली तर लगेच समजेल असे शिंदे यांनीकेसरीशी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment