Wednesday, December 12, 2018

बोगस लाभार्थी वगळण्यासाठी शिधापत्रिकाधारकांची पडताळणी

जत,(प्रतिनिधी)-
शासनाकडून अन्न-सुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारक कुटुंबातील सर्व सदस्यांना धान्य कमी दराने मिळत आहे. परंतु पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना आता कुटुंबातील सर्व सदस्यांचे धान्य मिळवण्यासाठी प्रशासनाच्या पडताळणी मोहिमेला सामोरे जावे लागणार आहे. याबाबत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने आदेश काढला आहे. या मोहिमेमध्ये बोगस लाभार्थी वगळण्यात येणार आहे.

शासनाच्या या आदेशानुसार सर्व रास्त भाव धान्य दुकानदारांना त्यांच्या पॉस मशीनमधील सर्व लाभार्थ्यांचे व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ आधार ऍक्ट 2016 नुसार बायोमेट्रिक ऑथोनटिकेशन करून देणे आवश्यक आहे. परंतु शिधापत्रिका डाटाबेसमधील सर्व सदस्यांचे व्हेरिफिकेशन यापूर्वी न झाल्याने हे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने आपल्या आदेशात नमूद केले आहे. राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांची नव्याने पडताळणी करण्याच्या दृष्टीने त्यांनी डिसेंबर हा महिना व्हॅलीडिशन महिना म्हणून साजरा करावा, असे आदेश दिले आहे.

No comments:

Post a Comment