Tuesday, December 11, 2018

जत तालुक्यातील १२ गावांतील सरपंच, उपसरपंच, सदस्य अपात्र

जत,(प्रतिनिधी)-
माडग्याळ, खंडनाळ, गिरगाव, करेवाडी, जाडरबोबलाद, अंकलगी, जालीहाळ खुर्द, सोन्याळ, संख, लकडेवाडी, आसंगी तुर्क, कुलाळवाडी येथील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी वेळेत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने विभागीय आयुक्त यांनी त्यांना अपात्र घोषित केले आहे.

     अपात्र झालेले सरपंच, उपसरपंच व सदस्य  पुढीलप्रमाणे : खंडनाळच्या सरपंच संगीता ऐवाले, गिरगाव येथील सरपंच गंगव्वा मांग, ग्रा.पं. सदस्य बसवराज पाटील, मुतव्वा मांग, रकमाई मदने, लायव्वा माने, अंकलगी - सरपंच सविता तेली, ग्रा.पं. सदस्या मल्लव्वा कांबळे, लक्ष्मी कोलकार, गणेश मांग, जालीहाळ खुर्द सरपंच सजाबाई जावीर, कुलाळवाडी सरपंच बजरंग कुलाळ, ग्रा.पं. सदस्य कमलाबाई मोटे, माडग्याळ ग्रा.पं. सदस्य शुभमंगल कोरे, सुवर्णा कोरे, रेखा कसबे, सोन्याळ ग्रा. पं. सदस्य बजरंग गारले, सखुबाई गारले, दयानंद मुचडी, विठ्ठल शिंदे, सुमन कांबले, संख ग्रा.पं. सदस्य विठ्ठल पुजारी, आसंगी ग्रा.प. सदस्या इंदा खोत, शुभांगी राक्षे, करेवाडी येथील ग्रामपंचायत सदस्या  महानंदा करे, जाडरबोबलाद उपसरपंच प्रकाश काटे, ग्रा.पं. सदस्या  महानंदा कलमडी, जिन्नासाहेब मणेरी, रेणुका आराणी, मल्लेशपा बिरादार, धानव्वा गेजगे, लकडेवाडी ग्रा. पं. सदस्य काशीनाथ बंडगर, कमलाबाई खोत.
    या ग्रामपंचायतीच्या कारभारात सहभागी होता येणार नाही. येत्या सहा महिन्यांत रिक्त होणार्‍या जागेवरती पुन्हा निवडणूक लागणार आहे. यामुळे या गावांतील इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत.

No comments:

Post a Comment