Saturday, December 29, 2018

नर्गिस फाकरी येतेय घाबरवायला


नर्गिस दिसायला सुंदर आहे. तिची व्यक्तिरेखा नेहमी रोमँटिक दाखवली जाते. नर्गिस फाकरी म्हटले की, समोर येते तिची रोमँटिक इमेज. तिचा रॉकस्टार सिनेमा असो नाहीतर हाऊसफुल 3 तिचा स्वीट लूक आठवतो. मात्र आता हीच नर्गिस घाबरवायला येते आहे. नर्गिसचा नवा सिनेमा रिलीज होणार आहे. त्याचं नाव आहे अमावस. बर्याच मोठ्या ब्रेकनंतर अभिनेता सचिन जोशी परत सिनेमात येतोय. या सिनेमात तो नर्गिसचा नायक आहे. अमावसचा ट्रेलर रिलीज झालाय. तो पाहून अंगावर काटाच येतोय.

 1920 इव्हिल रिटर्न्स, रागिणी एमएमएस 2 सारखे सिनेमे बनवणारे दिग्दर्शक भूषण पटेल या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. हॉरर सिनेमा चालणे हे खरं तर मोठे आव्हान असते. राम गोपाल वर्माने भूत हा हॉरर सिनेमा बनवला. तो हिट झाला. पण त्यानंतरचे त्याचे हॉट सिनेमे फारसे चालले नाहीत. पण रागिणी एमएमएस, एक थी डायन, राज 3, फुंक असे काही हॉरर सिनेमे चालले. आता अमावासला काय प्रतिसाद मिळतो हे जानेवारीत कळेल. सिनेमा 11 जानेवारीला रिलीज होतो आहे.

No comments:

Post a Comment