Friday, December 7, 2018

गुड्डापूरच्या दानम्मादेवी यात्रेत पाच लाख भाविक दाखल


जत,(प्रतिनिधी)-
 गुड्डापूर येथील महाराष्ट्र व कर्नाटक भक्तांचे प्रसिद्ध आराध्य दैवत श्री दानम्मा देवीच्या कार्तिक महिन्याची यात्रा बुधवारपासून (दि. 5) सुरू झाली असून ही यात्रा आजपर्यंत (शनिवार) होणार आहे. यात्रेत देवीचे दर्शन घेण्यासाठी चार ते पाच लाख भाविक मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत

गुड्डापूर येथे दानम्मा देवीची यात्रा सुरू झाली आहे. यावेळी यात्रेत कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले आहेत.
 चडचण, उमदी, उटगी, माडग्याळ या मार्गे भाविक पायी चालत येत आहेत. तसेच जत एस. टी. डेपोच्या गाड्या व कर्नाटक एस. टी. डेपोच्या गाड्या मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. कर्नाटक व महाराष्ट्र एसटीचे डेपो येथे करण्यात आले आहेत यात्रेसाठी येणारे सर्व भाविकांना अन्नदासोह (प्रसादाची व्यवस्था) सोरडी रोडला करण्यात आली आहे. यात्रेस येणारे भाविक मोठ्या प्रमाणात अन्न प्रसादाचा लाभ घेत आहेत. भाविकांना ट्रस्ट मार्फत व शासनाच्या सहकार्याने सात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. येथे हॉटेल, खेळणी; तसेच मिठाईचे स्टॉल लागले आहेत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment