Sunday, December 9, 2018

जत दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी-विक्री व्यवहाराचा बोजवारा

सर्व्हर डाउनमुळे नागरिक वैतागले
जत,(प्रतिनिधी)-
 जत येथील दुय्यम निबंधक कार्यालयात वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने खरेदी विक्री व्यवहाराचा बोजवारा उडाला आहेयामुळे जमीन खरेदी विक्री करणारे व अन्य प्रकारचे व्यवहार करणा-या लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहेयामुळे नागरिक पुरते वैतागून गेले आहेत.

या बाबत अधिक माहिती अशी कीजत दुय्यम निबंधक कार्यालयात सर्व्हर डाऊनमुळे सगळेच हैराण झाले आहेतसातबारा वरील दस्त नोंदनीची कामे सुरु ठेवण्यासाठी आता जिल्हाधिकारी यानी लक्ष घालून निर्णय घेणे अपेक्षित आहेऑनलाईन सातबाराच्या अडचणीमुळे जत दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी विक्री दस्तबक्षिस पत्रहक्क सोडपत्रगहाणखतहे दस्त नोंदणी होण्यामध्ये अडचण निर्माण होत आहेदिवसभर दुय्यम निबंधक कार्यालयात बसूनही दस्त नोंदणी न झाल्यामुळे हताश होऊन पक्षकारांना परत आपआपल्या गावी जावे लागत आहेयामुळे लोकांना मोठा आर्थिक फटका तर बसतच आहे शिवाय त्यांचा वेळही वाया जात आहे.
गेल्या अनेक महिण्यापासून सर्व्हर डाऊन होण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होतच राहिल्याने पक्षकारांची कामे वेळेत पूर्ण होऊ शकत नाहीतत्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या उमदी व संख येथील पक्षकारांना  खरेदी विक्री व्यवहारासाठी दिवसदिवसभर थांबून कामे न झाल्याने निराश होऊन गावी परतावे लागत आहे.त्यातच विजेचा पुरवठाही अचानकच खंडीत होत असल्याने त्याचा परिणाम ही दस्त नोंदणीवर होताना दिसून येत आहेसर्व्हर डाऊन होत असल्याने दस्त नोंदणी कामकाजात अडथळे निर्माण होऊन बरेच वेळा पक्षकारांमध्ये वादाचे प्रसंगही उद्भवले आहेतदुय्यम निबंधक कार्यालय कामकाज वारंवार होणारे खंडीत वीजपुरवठ्यामुळे ठप्प होत असल्याने प्रशासनाने या कार्यालयासाठी जनरेटरची सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे.
जत दुय्यम निबंधक कार्यालयात सातबाराप्रॉपरटी कार्डजमीनसंदर्भातील खरेदी विक्रीबक्षिस पत्रगहाणखत,
हक्क सोडपत्रमुखत्यारपत्र आदी दस्त केले जातातराज्यात दोन नंबरचा महसूल देणारे खाते म्हणून नोंदणी विभागाकडे पाहीले जातेपण याच विभागाकडे सातबारा बाबतचे दस्त ऑनलाईन सातबारा झाल्यापासून मोठ्या प्रमाणावर प्रलंबित राहू लागले आहेतत्यामुळे खरेदी विक्री व्यवहारासाठी आलेल्या पक्षकारांना सर्व्हर डाऊन मुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहेतरी महसूल विभागाने मुद्रांक व नोंदणी विभागाने आपला कारभार चांगल्या प्रकारे सुधारावाव जनतेला चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यातअशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment