Thursday, December 13, 2018

खासगी प्राथमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन


जत,(प्रतिनिधी)-
 जिल्ह्यातील शासन मान्य खासगी अनुदानित प्राथमिक शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या नऊ शिक्षकांची समायोजन प्रक्रिया काल पूर्ण झाली. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पूर्ण झाली.
 शैक्षणिक वर्ष 2017-18 2018-19 यामधील ऑनलाईन संचमान्यतेनुसार विद्यार्थी संख्येनुसार जिल्ह्यातील नऊ शिक्षक अतिरिक्त झाले होते. पलूस तालुक्यातून 3, सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 6 अशा 9 शिक्षकांचा समावेश होता

24 नोव्हेंबर 2018 पासून अतिरिक्त शिक्षकांचे रिक्त जागेवर समायोजन करण्याबाबत प्रक्रिया सुरू होती. शाळांमधील रिक्त अतिरिक्त असणार्या पदांची दोन वर्षांच्या संच मान्यता, रोष्टर रजिस्टर, सेवाज्येष्ठता यादी, नोव्हेंबर 2018 चे पगारबील, आलेल्या हरकती आदी बाबींची पडताळणी करून नऊ शिक्षक अतिरिक्त ठरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब कटारे यांनी समायोजन प्रक्रिया पारदर्शी करण्याबाबत लेखी निवेदन दिले होते.
. के. आठवले विनय मंदिर राजवाडा सांगली येथे उपस्थित शिक्षक, मुख्याध्यापक, रिक्त, अतिरिक्त शिक्षकांचे समुपदेशन करून ही प्रक्रिया पार पडली. यावेळी शिक्षणाधिकारी सौ. वाघमोडे यांचे मार्गदर्शनाखाली उपशिक्षणाधिकारी महेश धोत्रे, विस्तार अधिकारी विमल माने, रंगराव आठवले, रामचंद्र टोणे, वरिष्ठ सहाय्यक शकील लतीफ, अर्जुन चव्हाण, तौफिक पठाण यांनी समायोजन कार्यक्रम पार पाडला.

No comments:

Post a Comment