Monday, December 3, 2018

कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी दयासागर बन्ने


जत,(प्रतिनिधी)-
 सांगली आणि पलूस येथे होणार्या ग्रामीण साहित्य संमेलनात कविसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून कवठेमहांकाळ तालुक्यातील  देशिंग येथील ज्येष्ठ कवी दयासागर बन्ने यांची निवड केल्याची माहिती शासकीय जिल्हा ग्रंथालय व पलूस साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी दिली.
बन्ने यांच्या निवडीबद्दल चारुतासागर प्र ि त ष्ठ  ा न कवठेमहांकाळ, अग्रणी संमेलन, देशिंग, बालकुमार साहित्य संमेलन देशिंग, आम्ही हिंगणगावकर साहित्य संमेलन या सर्व साहित्य मंडळाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. दुष्काळी भागातील एक संवेदनशील कवी म्हणून साहित्य वर्तुळात दयासागर बन्ने यांचे नाव घेणे क्रमप्राप्त आहे. बन्ने यांचे काळी पांढरी, पडझड, पळसफूल, पेचपर्व आणि प्रिय हायकू इत्यादी साहित्य लोकप्रिय आहे. बन्ने गुरुजी यांनी ग्रामीण भागात तब्बल सोळा वर्षे सतत साहित्य संमेलनाच्या माध्यमातून चळवळ राबविली आहे.

No comments:

Post a Comment