Friday, December 7, 2018

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.एम.पाटील राजकारणात सक्रीय

जत,(प्रतिनिधी)-
गेल्या दोन वर्षांपासून आजारी असल्याने जतच्या दक्षिण भागातल्या राजकारणात दबदबा असलेले काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती पी.एम.पाटील राजकारणापासून दूर होते. यामुळे त्यांना काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदावरूनही दूर व्हावे लागले होते.पण आता ते पुन्हा राजकारणात सक्रिय झाले आहेत.

    सध्या बिळूर जिल्हा परिषद मतदारसंघात न शेतकर्‍यांशी संवाद साधत आहेत. काँग्रेसचे नेते विक्रम सावंत, उद्योजक लक्ष्मण जखगोंड यांच्यासोबत ते विविध कार्यक्रमांना उपस्थिती दाखवत आहेत. श्री.पाटील राजकारणात पुन्हा सक्रिय झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला आहे. काँग्रेस रिचार्ज झाली आहे. पाटील गेल्या दोन वर्षांपासून पित्ताशयाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांनी हैद्राबाद येथे उपचार घेतले आहेत.

No comments:

Post a Comment