Tuesday, December 4, 2018

वाजंत्री कलाकारांना कपडे वाटप

जत,(प्रतिनिधी)-
अखिल भारतीय होलार समाज संघाचे (ए गट) संस्थापक अध्यक्ष आबासाहेब ऐवळे यांच्या सहकार्याने जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश शिंदे याच्या हस्ते वाजंत्री कलाकारांना  कपडे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजी केंगार होते.

सुरेश शिंदे म्हणाले, आबासाहेब ऐवळे यांचे काम दखलपात्र असे आहे. समाजासाठी आहोरात्र काम करणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांना समाज बांधवांनी साथ द्यावी, असे आवाहन शिंदे यांनी केले. आबासाहेब ऐवळे म्हणाले, या गणवेशासाठी मदत भाऊसाहेब होनमाने यांनी केले. श्री. होनमाने हे अखिल भारतीय होलार समाज संघटना (ए गट) चे शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते पुढे म्हणाले, भविष्यात होलार समाजाला एका ऊंचीवर नेणार आहे. कला ही समाजाची देणगी आहे. ते जपण्याचे काम होलार समाज संघामार्फत करत आहोत. यावेळी बाजी केंगार, बिरू कांबळे, राजू ऐवळे, अरूण कणसे,पिंटू ऐवळे यशवंत हातेकर लक्ष्मण कांबळे, विक्रम कांबळे, दादा ऐवळे, अतुल जावीर, रमेश केंगार, तुकाराम ऐवळे, नगरसेवक स्वप्नील शिंदे आदी उपस्थित  होते.

No comments:

Post a Comment