Monday, December 3, 2018

शिक्षकांच्या प्रश्‍नांसाठी अधिकार्‍यांसह सी.ई.ओ.ची भेट : विनायक शिंदे


जत,(प्रतिनिधी)-
 जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत तोडगा काढण्यासाठी शिक्षण विभागाशी संबंधित सर्व खातेप्रमुखांच्या उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकार्यांची भेट घेणार असल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे व जिल्हा सरचिटणीस अविनाश गुरव यांनी दिली. दरम्यान, पंढरपूर येथे होणार्या महामंडळ सभेस मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आल्याचे सांगितले.

 शिक्षक संघाच्या (थोरात गट) जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच सांगलीत झाली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे पंढरपूर येथे होणार्या महामंडळाबाबत माहिती देण्यात येते. या महामंडळामध्ये शिक्षकांच्या प्रश्नाबाबत चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. शिक्षकांच्या शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, वरिष्ठ मुख्याध्यापक, विषय शिक्षक या पदांबाबतच्या पदोन्नती कराव्यात, विषय शिक्षकांची रखडलेली वेतनश्रेणी तात्काळ मिळावी, अंशदायी पेन्शन योजनेतून कपात झालेल्या रकमेचा तपशील तात्काळ शिक्षकांना मिळावा, अंशदान पेन्शन योजनेंतर्गत कपात झालेल्या रकमा संबंधित शिक्षकांच्या भविष्यनिर्वाह निधीच्या खात्यावर वर्ग कराव्यात, आंतरजिल्हा बदलीतून आलेल्या शिक्षकांचा परीविक्षाधीन कालावधी, कायमपणाचे फायदे यासारख्या अनेक विषयांवर मार्ग निघावा, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकार्यांची सर्व खातेप्रमुखांसोबत भेट घेण्याचे ठरले. यावेळी राज्य उपाध्यक्ष हंबीरराव पवार, अरुण पाटील पोपटराव सूर्यवंशी, रामभाऊ खोत, सलीम मुल्ला, महादेव हेगडे यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष व शिक्षक संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment