Monday, December 10, 2018

अनुकंपाची तात्काळ भरती न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा


जत,(प्रतिनिधी)-
 राज्य शासनाने दि. 15 फ ेब्रुवारी रोजी शासन आदेश काढून 20 टक्के पदभरती करण्यात यावी, अशी सूचना जिल्हा परिषदांना दिली आहे. तरीही जाणीवपूर्वक अनुकंपा भरतीमधील उमेदवारांची आडवणूक करण्यासाठी वर्षभर कोणतीही प्रक्रिया राबविली नाही. शासनाने आंदोलनाची दखल घेवून तात्काळ अनुकंपाची भरती करुन त्यांना न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही धनगर समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष तानाजी व्हनमाने यांनी दिला आहे.

राज्य शासनाने घोषित केलेल्या सरळ सेवा भरतीच्या अगोदर अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रिया पूर्ण करावी, अनुकंपा उमेदवारांचा अनुशेष भरून काढावा यांसह इतर मागण्यांसाठी अनुकंपा यादीतील उमेदवारांनी धनगर समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष तानाजी व्हनमाने यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्यात आले. या आंदोलनास राष्ट्रवादी काँगेस, शिवसेना, मनसे या पक्षांसह मुस्लिम समाज संघटनेसह विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनस भेट देवून पाठींबा दिला. जिल्हा परिषद प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरळ सेवा भरतीअगोदर अनुकंपा भरती करावी, मे 2018 च्या शासन निर्णयानुसार सरळ सेवा व अनुकंपा भरतीचा काही संबंध नसल्याने ही भरती तात्काळ करण्यात यावी, ‘वर्ग पदे भरावीत, अनुकंपा उमेदवारांचे वय निघून गेल्याने भरतीस उमेदवार अपात्र ठरले आहेत, यावर उपाययोजना करावी, ही भरती कंत्राटी पध्दतीने न करता कायम स्वरूपी करावी, 2015 ते 2018 पर्यंतचा अनुकंपा उमेदवारांचा अनुशेष भरुन काढावा यांसह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अनुकंपा यादीतील बहुतांशी उमेदवारांचा समावेश होता. या आंदोलनास तौसीफ मुनशी, वसीमभाई बलबंड, शिवसेनेचे नेते शेखर माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, मनसेचे हरिभाऊ पडळकर, सुखदेव काले आदींनी भेटी देवून मागणीस पाठींबा दिला.

No comments:

Post a Comment