Saturday, December 1, 2018

सर्व शासकीय कार्यालये तंबाखू मुक्त करा


जत,( प्रतिनिधी)-
राज्यातील सर्व शासकीय कार्यालये  ‘तंबाखूमुक्त क्षेत्र’ करण्याचे परिपत्रक केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या सचिव प्रीती सूदन यांनी जारी केले. हे परिपत्रक सर्व राज्याच्या सचिवांना जारी केले आहे.  यामध्ये प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागात तंबाखूमुक्त क्षेत्र असल्याची सूचना लिहीने आणि उल्लंघन करणा-यांकडून २०० रुपयांचा दंड वसूल करण्याच्या सूचना केल्या आहेत.

    तंबाखूचे सेवन केल्याने आणि सिगारेट ओढल्यामुळे कॅन्सर, ह्रदयरोग, मधुमेह, जुनाट फुप्फुसांचे आजार, पक्षाघात, वंध्यत्व, आंधळेपणा, टीबी आणि तोंडाचे आजार होतात. तंबाखूचे सेवन न करणारे त्याकडे ओढले जाउ नयेत यासाठी सार्वनिक ठिकाण, शासकीय कार्यालये व कँटीन येथे तंबाखूचे सेवन करणे किंवा ओढणे यावर ‘कोट्‌पा कायदा २००३ नुसार शासनाने बंदी घातलेली आहे.  स्वच्छ भारत, स्वस्थ भारत या घोषणेअंतर्गत दिल्लीतील निर्माण भवनही तंबाखूमुक्त क्षेत्रा जाहिर केलेले आहे. त्याप्रमाणे राज्यातील शासकीय कार्यालये व्हावी अशा सूचना या परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.
राज्यासाठी  या आहेत सूचना
-प्रत्येक शासकीय कार्यालयात प्रवेशद्वार, लिफट, प्रत्येक मजल्यावर ‘तंबाखूमुक्त क्षेत्र’ याचा ६० बाय ३० सेंटीमीटरचा फळा (बोर्ड) असेल
- ‘या क्षेत्रात कोणत्याही प्रकारे तंबाखूचे सेवन करण्यावर बंदी असून उल्लंघन करणा-यांकडून दोनशे रुपये दंड आकारण्यात येईल’ ही  इंग्रजी आणि स्थानिक भाषेतील सूचना या फळयावर असेल
-उल्लंघन करणा-याविषयी कोणाकडे तक्रार करायची त्या अधिका-याचे नाव आणि संपर्क क्रमांक या फळयाच्या तळाशी असेल. 
-प्रत्येक इमारतीच्या प्रवेशद्वारावर तंबाखूजन्य पदार्थ काढून ठेवण्यासाठी एक बॉक्स ठेवण्यात यावा
-सूचनांचे उल्लंघन करणा-याकडून आकारण्यात आलेला दंड केंद्र शासनाच्या त्या - त्या विभागात जमा करण्यात यावा.

No comments:

Post a Comment