Tuesday, December 4, 2018

महिलांसाठी दुग्धजन्य पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण


सांगली,(प्रतिनिधी)-
 ग्रामीण भागातील महिलांना दुग्धजन्य पदार्थ बनवण्यासाठी प्रशिक्षण देण्याची योजना जिल्हा परिषद महिला बाल कल्याण विभागाने हाती घेतली असून त्यासाठी 9 लाख 92 हजार रुपयांची तरतूद जिल्हा परिषद स्वीय निधीतून करण्यात आली आहे. एका महिलेला सात दिवस प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया तालुका पातळीवरून राबवण्यात येत आहे

जिल्ह्यातील 800 ते 1000 महिलांना या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खाजगी संस्थेस हे काम देण्यात येत आहे. महिला व बाल कल्याण समितीत यावर चर्चा करून हे प्रशिक्षण देण्यासाठी प्रतिमहिलेसाठी दोन हजार रुपये देण्याचे नक्की केले आहे. हे काम खाजगी एजन्सीला देण्यात येणार आहे. तालुका पातळीवरून ही योजना राबवण्यात येणार आहे. प्रतिप्रकल्प 76 हजार रुपये या प्रमाणे 13 ही प्रकल्पांसाठीचे हे 9 लाख 92 हजार रुपये तालुका पातळीवर वितरीत करण्यात आले असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आली. खवा, बर्फी, दही, ताक यासह सर्वच दुग्धजन्य पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सात दिवस चालणार्या या प्रशिक्षणाचा संपूर्ण कार्यक्रम निश्चित केला आहे. शेवटच्या दिवशी प्रशिक्षणात सहभागी होणार्या सर्व महिलांची तालुक्यातील एका दूध प्रक्रिया संस्थेस प्रत्यक्ष पाहणीसाठी भेट आयोजित करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment