Tuesday, December 11, 2018

येळवी तलावात पाणी सोडण्यासाठी प्रयत्न : जगताप

जत,(प्रतिनिधी)-
दुष्काळग्रस्तांची  तहान भागविण्यासाठी म्हैसाळ योजनेचे  पाणी जत तालुक्यात आले आहे. टप्प्याटप्याने जसे काम पूर्ण होईल  तसे पाणी सोडण्यात येणार आहे. ज्या भागात कँनाँल आहे व ज्यांनी पैसे भरले आहेत तेथे पाणी सोडण्याची व्यवस्था करण्यात येईल .अशी माहिती आमदार विलासराव जगताप यांनी दिली. सनमडी व घोलेश्वर ( ता.जत ) येथील पाणी पूजन समारंभ प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

   पाण्याची गरज सर्वानाच आहे. परंतु  आम्हालाच प्रथम पाणी पाहिजे असा आग्रह धरून कालवा फोडून शासकीय मालमत्तेचे नुकसान करु  नये. बेकायदेशीर कालवा फोडल्यास संबधीतावर गुन्हे दाखल होणार आहेत. जिल्हाधिकारी यांनी कालवा परिसरात  कलम १४४ लागू केले आहे. तालुक्यातील शेतकरी व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. येळवी ( ता.जत ) साठवण तलावात पाणी सोडण्यासाठी प्रशासकीय पातळीवर  प्रयत्न केला जाणार आहे .असेही आमदार विलासराव जगताप यानी यावेळी सांगितले.
      यावेळी घोलेश्वरचे सरपंच अल्लाबक्ष नाईक, खैरावचे सरपंच राजाराम घुटुकडे, टोणेवाडीचे सरपंच अशोक टोणे, कुणिकोनूरचे सरपंच लक्ष्मण पाटील, निगडी खुर्दचे उपसरपंच प्रमोद सावंत, सनमडीचे उपसरपंच तम्मण्णा करळे, सनमडी तंटामुक्तीचे अध्यक्ष महादेव सरगर, व मनगु सरगर, राजु मोटे, नेताजी पवार भानुदास राजगे, शिवनेरी कॉन्ट्रक्शनचे अध्यक्ष दऱ्याप्पा जमदाडे, लिंबाजी सोलनकर, कुमार जिपटे, तानाजी जमदाडे, विजय शिंदे, गोरख टोणे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment