Monday, December 3, 2018

हँगआऊट्स बंद होणार!


जत,(प्रतिनिधी)-
एका वृत्तसंस्थेने सोशल मिडियावर काम करणार्या लोकांसाठी एक बातमी दिली आहे,ती म्हणजे गुगलचे मेसेजिंग अॅप हँगआऊट्स 2020मध्ये बंद होण्याची शक्यता असल्याची!  9टू 5 गुगलच्या अहवालाचा हवाला देण्यात आला आहे.

2013मध्ये गुगलनं जी-चॅटऐवजी हँगआऊट्स सुरू केलं होतं. गेल्या काही वर्षांपासून कंपनीने या अॅपमध्ये अपडेट करणे बंद केले आहे. याशिवाय मेसेजिंग सुविधाही बंद केली आहे. जीमेल वेबवर हँगआऊट्स हे अजूनही चॅटिंगसाठी उत्तम पर्याय आहे. जीमेलचे बहुतांश युजर्स हे अॅप वापरतात. गुगल प्ले स्टोरवर अजूनही हँगआऊट अॅप उपलब्ध आहे. गुगल हँगआऊट्स हे संवाद आणि संपर्काचे चांगले माध्यम आहे. मेसेजिंग, व्हिडिओ चॅटिंग, एसएमएस आणि व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल आदी फीचर्ससह ते कंपनीने लाँच केले होते. हे अॅप आता जुने वाटू लागले आहे आणि ते हाताळण्यात अनेक अडचणी येत आहेत. याशिवाय अनेक बग्स येऊ शकतात, असं म्हणणं अनेक युजर्सनं मांडल्याचं एका अहवालात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment