Thursday, December 6, 2018

शिवाजी महाराजांच्या न्यायकारभाराची आज गरज: खंडू डोईफोडे

ज्ञानेश्वर स्मृति व्याख्यानमाला पुष्प पहिले
जत,(प्रतिनिधी)-
शिवाजी महाराजांच्या काळात एक आण्याचाही भ्रष्टाचार नव्हतास्त्रियांवर अत्याचार करणार्यांचे हात कलम केले जायचेअशा न्यायकारभाराची आज गरज असल्याचे प्रतिपादन खंडू डोईफोडे (बार्शीयांनी जत येथील श्रीज्ञानेश्वर स्मृति व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना केले.

जत येथील रामराव विद्यामंदिर हायस्कूल येथे सालाबादप्रमाणे श्रीज्ञानेश्वर स्मृति व्याख्यानमाला आयोजित करण्यात येतेयंदाचे वर्षे 24 वे वर्ष आहेयावेळी बोलताना श्री.डोईफोडे म्हणालेशिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडविलात्यांना जर आणखी दहा वर्षे आयुष्य मिळाले असते तर दुसर्या कुणालाही राज्य करता आले नसतेत्यांच्या काळात गडांची उभारणी झालीआज तेच त्यांच्या गाथेची साक्ष देतातआज गड जपले पाहिजेतयुद्धात मारले गेलेल्या मावळ्यांच्या कुटुंबियांना तनखा दिली जात असेसर्व बाजूंनी असा आदर्श कारभार होतायाचा आदर्श घेऊन आपण पुढे मार्गक्रमण करीत राहिलो तर देश लवकरच महासत्ता झाल्याचे पाहायला मिळेल.
यावेळी आमदार विलासराव जगतापसंभाजी सरकएन.एम.सूर्यवंशीदीपक शिंदेपापा कुंभारएम.बी कोहळी,प्रमोद पोतनीससुभाष बालगावकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment