Tuesday, December 11, 2018

प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन


संभाजीराव थोरात यांची घोषणा
जत,(प्रतिनिधी)-
 शासनाने वरिष्ठ वेतन श्रेणीचा ऑक्टोबरचा शासन आदेश रद्द करावा, फेब्रुवारीच्या बदली आदेशात दुरुस्ती करावी, जुनी पेन्शन लागू करावी, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य नेते संभाजीराव थोरात यांनी केली.

विनाअट वरिष्ठ वेतन श्रेणी लागु करावी, एम.एस.सी.आय. टी.ला .मुदतवाढ, सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, शिक्षकांकडील अशैक्षणिक कामांचा बोजा कमी करून अध्यापनाला वेळ द्या, सातव्या वेतन आयोगाची तात्काळ अंमलबजावणी करावी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकार्याचे पद शिक्षकांमधून भरण्यात यावे, प्राथमिक पदवीधरांच्या काढून घेण्यात आलेल्या वेतन श्रेणी पूर्ववत सुरू करण्यात याव्यात, या मागण्या मांडण्यात आल्या.
 समायोजन, समानीकरण यासह शिक्षकांच्या विविध समस्यांवर चर्चा व नियोजन करून आगामी ध्येयधोरण ठरविण्यात आले. त्यासाठी राज्य संघ मोठे आंदोलन उभारणार आहे. लाखोंच्या संख्येने शिक्षक रस्त्यावर उतरतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी राज्यातील शिक्षक संघाचे हजारो सदस्य, कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. बाळासाहेब तांबारे, आप्पासाहेब कूल, अंबादास वाजे, जनार्दन नेऊंगरे, एन. वाय. पाटील, मोहन भोसले, सोलापूरचे अध्यक्ष म. . मोरे, पुण्याचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, सांगलीचे अध्यक्ष विनायक शिंदे, पोपटराव सूर्यवंशी, अरुण पाटील, तानाजीराव खोत, अविनाश गुरव, राजकुमार पाटील, अशोक महिंद, शशिकांत माणगावे, श्रीकांत पवार, फत्तु नदाफ, तालुकाध्यक्ष अजित पाटील, संतोष जगताप, नंदकुमार खराडे, देवाप्पा करांडे, आसिफ मुजावर, अनंत सपकाळ, नितीन चव्हाण, शिवाजी चव्हाण, गोपाळ व्हनमाणे, मोहन माने, शिक्षक बँकेचे संचालक सुधाकर पाटील, महादेव हेगडे, श्यामगोंडा पाटील, बाजीराव पाटील, अशोक पाटील व राज्य सदस्य सलीम मुल्ला; तसेच सांगली जिल्ह्यातील राज्य, जिल्हा तालुका संघाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत.

No comments:

Post a Comment