Saturday, December 29, 2018

आता टीकेमुळे काहीही फरक पडत नाही : कॅटरिना


अभिनेत्री कॅटरिना कैफचे म्हणणे आहे की, आता ती आपल्यावर होणार्या टीकेची बिलकुल चिंता करत नाही. एक असाही काळ होता, जेव्हा टीका व्हायची तेव्हा करिअर संपुष्टात येण्याची भीती वाटायची, परंतु आता कोणत्याही प्रकारच्या टीकेने काहीही फरक पडत नाही, असे स्पष्ट केले आहे.

अभिनेत्री कॅटरिना कैफला बॉलिवूडमध्ये थोडीथोडकी नव्हे, तर पंधरा वर्षे झाली आहेत, परंतु अभिनयाच्या बाबतीत आजही कॅटरिनावर टीकेची झोड उठतच असते. सध्या आगामी चित्रपट झीरोच्या प्रमोशनमध्ये बिझी असलेल्या कॅटरिनाने यासंदर्भात बोलताना म्हटले की, बॉलिवूडमध्ये कामाला सुरुवात करून आता खूप मोठा काळ लोटला आहे. कदाचित त्यामुळेच आता कोणत्याही प्रकारच्या टीकेने मला काही फरक पडत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की, माझे सर्वांशीच खूप चांगले नाते आहे. त्यामुळे मीडियामध्ये होणार्या कामाच्या टीकेची मला भीती वाटत नाही. ज्याला जे बोलायचे किंवा लिहायचे त्याने ते बोलावे किंवा लिहावे, आता काय? कॅटरिना पुढे म्हणाली, सुरुवातीला जेव्हा कोणत्याही प्रकारची टीका छापून यायची तेव्हा मी खूप टेंशन घ्यायचे.

No comments:

Post a Comment