Monday, December 3, 2018

सोमनिंग बोरामणी यांचे विविध मागण्यांसाठी आज उपोषण


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यातील शेतकर्यांच्या वतीने संख (ता. जत) येथील अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर आज (मंगळवार) एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे निवेदन जत तालुक्याचे युवा नेते सोमनिंग बोरामणी यांनी तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

 निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील खरीप व रब्बी हंगाम पाण्याअभावी वाया गेल्याने शेतकर्यांच्या पिकाचा पंचनामा करून नुकसानभरपाई मिळावी. मागेल तिथे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करावी. जनावरांना मेंढ्यांना चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. तालुक्यातील शेतकर्यांचे कर्ज माफ करावे आदी मागण्यासाठी आज सोमनिंग बोरमणी अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत.

No comments:

Post a Comment