Thursday, December 6, 2018

जतच्या डॉ. श्रीकांत कोकरे यांची सोलापूर विद्यापीठ परीक्षा संचालकपदी निवड


जत,(प्रतिनिधी)-
जत येथील राजे रामराव महाविद्यालयाचे डॉप्राश्रीकांत कोकरे यांची  सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे.या निवडीमुळे जतच्या इतिहासात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

     सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉमृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या निवड समितीने विद्यापीठाच्या नव्या कायद्यानुसार डॉकोकरे यांची परीक्षा संचालकपदी निवड केल्याची माहिती प्रभारी कुलसचिव डॉव्हीबीघुटे यांनी दिलीबीपीपाटील यांच्या सेवा समाप्तीनंतर परीक्षा संचालक पद हे रिक्त होतेसध्या या पदाचा पदभार कुलगुरु डॉफडणवीस यांच्याकडे आहेविद्यापीठातील हे महत्त्वाचे पद असून यासाठी मंगळवारी एकूण 9 जणांनी मुलाखत दिली होतीत्यातून डॉकोकरे यांची निवड झाली आहेबुधवारी  त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.   
     पुढील आठवड्यात त्यांनी  या पदाचा पदभार स्वीकारणार असल्याचे दैनिक लोकमतशी बोलताना सांगितले.  डॉकोकरे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या सोलापूर उपकेंद्रातून एम.एस्सीफिजिक्स पूर्ण केले आहेपी.एचडीदेखील सोलापूर विद्यापीठातून प्राप्त केली आहे. 1993 पासून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरच्या तासगावजतइचलकरंजी आणि उस्मानाबाद येथील महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य करीत आहेत.सध्या ते जत येथील राजे रामराव महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करीत होतेविद्यापीठाच्या या पदाला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.2 comments:

  1. कोकरे सर आपले अभिनंदन
    आपल्या निवडीचा आनंद आणि अभिमानही आहे.परीक्षा आणि निकाल या बाबतीत आपले विचार मी जाणून आहे त्यामुळे आपल्या अनुभवाचा या नव्या जबाबदारीच्या ठिकाणास नक्कीच लाभ होईल, काटकर परिवारातर्फे शुभेच्छा

    ReplyDelete
  2. कोकरे सर आपले हार्दिक अभिनंदन.- Mali A S Rampur

    ReplyDelete