Monday, December 3, 2018

मराठा आरक्षणाचे मराठा स्वराज्य संघाकडून स्वागत


जत,(प्रतिनिधी)-
 जत येथे मराठा आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर मराठा स्वराज्य संघ व मराठा सेवा संघाच्या पदाधिकार्यांनी एकत्र येऊन या निर्णयाचे स्वागत केले व मराठा आरक्षण आंदोलनात भाग घेऊन शहीद झालेल्या 42 युवकांना आदरांजली वाहिली.
यावेळी मराठा स्वराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाषराव गायकवाड यांनी आरक्षणासाठी आंदोलनावेळी सहकार्य केलेल्या धनगर, माळी, लिंगायत समाज, मुसलमान व इतर समाजाचे आभार मानले. या कार्यक्रमास वसंतराव चव्हाण, रमेशराव शिंदे, बाळासाहेब जाधव, अनिल शिंदे, बाजीराव शिंदे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

No comments:

Post a Comment