Thursday, December 13, 2018

सरकारी कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग देऊ नका


 शेतकरी संघटनेची मागणी
जत,(प्रतिनिधी)-
 राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे, शासन आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे सांगत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयांची मोठी घसरण झाली आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता शासनाने सरकारी कर्मचार्यांना 7 वा वेतन आयोग लागू करून शासनाच्या तिजोरीवर व जनतेवर अधिक ओझं न लादता सरकारी कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग देऊ नका, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. उलट त्यांना 5 वेतन आयोगच द्यावा, असेही मागणीत म्हटले आहे.

शेतकरी संघटनेचे अशोक माने यांनी ही मागणी केली आहे. माने म्हणाले, राज्य दुष्काळात होरपळत असताना सरकारी कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग देऊ नये. आर्थिक परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करून कर्मचार्यांना पाचवा वेतन द्यावा. स्वातंत्र्याची सत्तरी ओलांडली तरी रुपयांची घसरण सुरूच असून आजघडीला 73 रुपयाबरोबर एक डॉलर अशी झाली आहे, वेळीच कठोर निर्णय घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने खर्चावर नियंत्रण आणावे. कर्मचार्यांना पाचव्या वेतनाप्रमाणे वेतन द्यावा, सातवा तातडीने रद्द करण्यात यावा. देशात एक रुपया डॉलरच्या तुलनेत भक्कम झाल्याशिवाय वेतन वाढ करु नये, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव माने यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment