Wednesday, December 5, 2018

पल्लवी पाटील यांची अखेर मंगळवेढ्याला बदली


जत,(प्रतिनिधी)-
जत येथे आपली कारकीर्द गाजवून गेलेल्या पलूस नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांची मंगळवेढा नगरपरिषद (जि. सोलापूर) येथे बदली झाली आहे. मागील काही दिवसांपासून पाटील यांची बदली होणार, अशी चर्चा होती. अखेर आज त्यांच्या बदलीचे आदेश मंत्रालयातून निघाले आहेत.

त्यांच्या जागी विट्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना अतिरिक्त मुख्याधिकारीचा तात्पुरता पदभार दिला आहे मुख्यधिकारी पाटील यांची बदली मंगळवेढ्याला केली आहे. नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारण्याचे निर्देश त्यांना दिले आहेत. तसेच रोकडे यांच्याकडे कार्यभार सोपवण्याचे आदेशही दिले आहेत. अपर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांची स्वाक्षरी असलेलं पत्र दिले आहे. पलूस नगर परिषदेची स्थापना 16 मार्च 2016 रोजी झाली. त्यानंतर तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी प्रशासक म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली. महेश रोकडे 28 डिसेंबर 2016 पासून 2 जुलै 2017 पर्यंत मुख्याधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यानंतर पल्लवी पाटील यांनी तीन जुलै 2017 पासून पदभार स्वीकारला होता.
गेल्या काही दिवसांपासून मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या विरोधात मोहीम उघडली होती. यानंतर नगरसेवक आणि स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन बदलीसाठी प्रयत्न सुरू केले होते. सत्ताधारी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यात जोरदार वाद होता. मासिक बैठकीला सत्ताधारी गैरहजर होते. त्यानंतर मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांनास्वच्छ सर्वेक्षण सन 2019’बाबत पत्र पाठवले व पदाधिकार्यांच्या असहकार्याबद्दल कळवले होते. यापूर्वी जतमधूनही काही कारणामुळे पल्लवी पाटील यांची बदली करण्यात आली होती.

No comments:

Post a Comment